जळगाव राजमुद्रा दर्पण | यंदा उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याअभावी पिकं कोरडी पडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत आंबिया बहारमधील केळी पिकाचे १ ते १५ मे मध्ये सलग पाच दिवस तापमान ४५ अंश आणि त्यापेक्षा अधिक तापमानामुळे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना ४६,५०० प्रमाणे नुकसान भरपाई मंजूर होईल. तसेच यापूर्वी कमी तापमानाने झालेल्या नुकसानीची भरपाई २६,५०० अशी एकूण ७० हजारांची प्रती हेक्टरी मंजूर झाली, अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांच्याकडून देण्यात आली. १ मे पासुन १५ मे २०२२ दरम्यान जास्त तापमान मुळे झालेल्या नुकसान भरपाईस जळगांव जिह्यातील तालुका व महसूल मंडळे खालील प्रमाणे.
१. चोपडा : अडावद, चाहार्डी, चोपडा, धानोरा प्र., गोरगावले
२. बोदवड : बोदवड, नाडगाव.
३. जामनेर : जामनेर, नेरी बू., पहूर, शेंदुर्णी.
४. मुक्ताईनगर : मुक्ताईनगर, अंतूर्ली, घोडसगाव, कुऱ्हे
५. यावल : बामनोद, भालोद, फैजपूर, किनगाव बू., सकाळी, यावल.
६. रावेर : ऐनपुर, खानापूर, खिर्डी बू., खिरोदा, निंभोरा बू., रावेर, सावदा.
७. भुसावळ : वरणगाव, कु-हे, पिंपळगाव खु., भुसावळ