जामनेर राजमुद्रा दर्पण | महिलेला कोल्ड्रिंक पाजून तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याची घटना जामनेर तालुक्यात घडली आहे. या बाबद जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारचा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
संपूर्ण माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या तीस वर्षीय महिलेवर सुमारे एक वर्षापूर्वी गोविंदा जगन पवार, श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक या तीन जणांनी कोल्ड्रिंग पाजून जामनेर ते भुसावळ दरम्यान असलेल्या एका हॉटेलवर नेऊन अनैसर्गिकरित्या अत्याचार केला. यावेळी अनैसर्गिक अत्याचार करतांना मनीषा हिने विडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबत पीडित महिलेने जामनेर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोविंद जगन पवार, श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.