जळगाव राजमुद्रा वृत्त सेवा | भाजपचा महापौर असताना महापालिका कर्जमुक्त केली असा दावा आज भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषेदत करण्यात आला आहे, भाजपच्या कार्यकाळातच शहरच्या कल्याणासाठी विविध विकासकामांचा ठराव करण्यात आला म्हणूनच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निधी देता आला अन्यथा आम्ही ठराव करून ठेवले नसते तर निधी शिफारस कशी करता आली असती असा पलटवार आज भाजपने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केला आहे. यावेळी जिल्हामहानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी ,स्थायीसमिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील ,व नगरसेवक कैलास सोनावणे यांची उपस्थिती होते.
काल रोजी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डीपीडीसी ( जिल्हा नियोजन ) मधून ६१ कोटी काही विकास योजनांन मधून महापालिकेला दिले त्यांनी आज पर्यत असा कोणताच पालकमंत्री नाही कि त्यांनी एवढा निधी महापालिकेला शहराच्या विकासाठी दिला असेल तसेच माजी मंत्री गिरीश महाजन हे पालकमंत्री असताना एक नवा पैसा त्यांनी शहराच्या व जिल्ह्याच्या विकासाठी आणला नाही तसेच शहराची त्यांनी वाट लावली असा आरोप त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर केला त्याहून अधिक म्हणजे गिरीश महाजन हे निष्क्रिय पालकमंत्री ठरले अशी टिक्का देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
यावरून पालकमंत्र्यांच्या उत्तरावर पलटवार करून आपली बाजू पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे. भाजपच्या कार्यकाळात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या १०० कोटी निधी वरील स्थगिती आगोदर उठवा असे आवाहन देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भाजप कडून देण्यात आले आहे. एकंदरीत शिवसेना – विरुद्ध भाजप असा पुन्हा एकदा नवा वाद महापालिकेच्या विकासनिधी वरून गाजताना दिसणार आहे.