जळगांव राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी कायम असलेले पोलिस अधिकारी स्टायलिश लूक मध्ये पाहायला मिळाले. पाहायला गेलं तर पोलिस नेहमीच खकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पोलिसांचा हा आगळावेगळा लूक आपल्याला पाहायला मिळाला.
नुकत्याच पार पडलेल्या पोलीस वेलफेअर विभाग आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सर्व अधिकारी सुटा, बुटात आले होते. सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना एक स्टायलिश फोटो अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी ट्विट केला आहे. जिल्ह्यातील पोलीस प्रशासनातील प्रमुख अधिकारी वर्ग सहजासहजी खाकी शिवाय पाहायला मिळत नाही, त्यातल्या त्यात सूट, बूट घालून स्टायलिश अंदाज तर क्वचितच नजरेस पडतो. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा एक फोटो नुकतेच समोर आला आहे. जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गेल्या महिन्यात पोलीस वेलफेअर अंतर्गत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे आणि प्रसिद्ध टीव्ही शो ‘चला हवा येऊ द्या’ फेम टीम जळगावात आली होती. पोलीस मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षानंतर पार पडलेला कार्यक्रम सुपरहिट झाल्याने सर्व खूप आनंदात होते. कार्यक्रमाच्या नियोजनात आणि मान्यवरांच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा एक फोटो अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी ट्विट केला असून कॅप्शन देखील दिले आहे.
फोटोमध्ये जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, सहाय्यक अधीक्षक अशीत कांबळे, डीवायएसपी संदीप गावीत आणि डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे दिसत आहे. रुबाबात आणि एका जोशात मार्गक्रमण करीत असलेल्या या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे,आणि यापुढे देखील ते कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे. खकीचा अभिमान दर्शवणारा हा फोटो अनेकांचे आकर्षण बनत आहे.