मुक्ताईनगर राजमुद्रा दर्पण | मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव गावामध्ये नाल्याच्या शेजारी असलेल्या इलेक्ट्रिक खंबावरून तार पडला, आणि तार पडल्यामुळे तिथे आग लागली. सध्या वाढत्या तापमानामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते आहे. दरम्यान, गावकर्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. तसेच महसुल व पोलीस प्रशासन यांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली.
घटना स्थळी तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीदार झांबरे व पोलीस प्रशासनाचे पो. कॉ. संतोष चौधरी, पो.का गजमल पाटील वरणगाव येथील अंग्नीशामक दलाचे मधुकर पाटील, मनोज चौधरी, विलास शेळके, योगेश भोई, वरणगाव यांनी आग विझवण्यात सहकार्य केले. तसेच गावचे पोलीस पाटील देशमाने सरपंच उपसरपंच व शिवसेना कार्यकर्ते भागवत कोळी यांनी सहकार्य केले.या आगेचे कारण फक्त वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे लागली असावी असे गावातील नागरीक उघडपणे बोलत आहे.
शेतकऱ्यांच्या पेरणीच्या वेळेस पाईप लाईन जाळली गेली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे.