जळगाव राजमुद्रा दर्पण | पोलीस गस्तीवर astanna जप्त केलेल्या १० लाखांच्या रकमेमधून दिड लाखावर डल्ला मारल्यामुळे जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या जागी पो.नि. अरुण धनवडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सायंकाळीच पदभार स्वीकारला
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात रिक्त असलेल्या जागांसह विनंती अर्जावरुन पोलीस निरीक्षकांच्या दीड महिन्यांपुर्वी बदल्या झाल्या होत्या. यात पारोळ्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांची जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अवघ्या दीड महिन्यानतच दीड लाखाचा डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे.
त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पो.नि.भंडारे यांची तडकाफडकी निर्णय करुन त्यांची नियंत्रणकक्षात बदली केली आहे. तसेच याप्रकरणातील पोलीस कर्मचारी महेंद्र बागुल यांचीही पोलीस मुख्यालयात बदली केली आहे. याबाबतचे आदेश देखील पोलीस अधीक्षकांनी सायंकाळी निर्गमीत केले आहेत.
शहरातील सोन्याचे व्यापारी सोने घेवून गेवराई जि. बीड येथे गेले होते. व्यापार्याला सोने दिल्यानंतर ते दहा लाखांची रोकड घेवून रात्री दीड वाजेच्या सुमारास जळगावला आले होते. यावेळी रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पथकाने त्यांना जुने बी.जे.मार्केट परिसरातून ताब्यात घेत त्यांची विचारपूस करीत असतांना संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणले.
दुसर्या दिवशी व्यापार्याकडून सोने खरेदीचे कागदपत्रांची तपासणी केली. आणि जप्त केलेली दहा लाखाची रोकड परत न करता त्यातून पोलीस कर्मचारी महेंद्र बागुल यांनी दीड लाखांची रोकड बाजूला काढून उर्वरीत साडेआठ लाखांची रोकड संबंधित व्यापार्याला परत दिली. झालेला प्रकारा संदर्भातील तक्रार थेट पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली होती.