महाराष्ट्र राजमुद्रा दर्पण | कोरोना रुग्णांची महाराष्ट्र राज्यात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज रुग्णसंख्या 300 पर्यंत पोहोचली होती. आज नव्या 307 रुग्णांची भर पडली आहे तर 252 रुग्ण कोरोना मुक्ता होऊन घरी परतले असून गेल्या 24 तासामध्ये राज्यातील एका कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला आहे.
राज्यात आज एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र मधला मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,32,81 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके आहे. राज्यातील सध्या कोरोणा रुग्ण असलेल्यांची रुग्ण संख्या ही 1605 इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे 1002 सक्रिय रुग्ण हे मुंबईत आहे त्यानंतर पुण्याचा नंबर लागतो पुण्यामध्ये सध्या 305 इतके बाधित रुग्ण आहेत. तसेच राज्याची राजधानी मुंबईमध्ये 194 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहे.