मुंबई राजमुद्रा दर्पण | कोरोनापेक्षा प्रदूषणाचा कहर वाढत जात आहे. इतकेच नाही तर प्रदूषणामुळे मृत्युदरही वाढत जात आहे. प्रदूषणामुळे होणारे मृत्युदर समोर येत आहे. प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, हे भीषण वास्तव या आकड्यांद्वारे निदर्शनास आले आहे.
भारतात 2019 मध्ये प्रदूषणामुळे 23.5 लाखांहून अधिक लोकांचा बळी गेल्याचं ‘द लॅन्सेट प्लॅटेनरी हेल्थ जर्नल’मार्फत प्रसिद्ध कऱण्यात आले होते.या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जगभरातील सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे वर्षाला सुमारे 9 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. कारखान्यातील धूर, वाहने, रेल्वे यांच्या धूरामधून होणारे वायुप्रदूषण यामुळे 2,000 पासून 55 टक्क्यांनी वाढले आहे.
अभ्यासानुसार, 23 लाख मृत्यूंपैकी सुमारे 16.7 लाख मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे आणि 5 लाखांहून अधिक मृत्यू जलप्रदूषणामुळे झाले आहेत. भारतातील बहुतेक वायू प्रदूषणाशी संबंधित मृत्यू पीएम 2.5 कणांमुळे होणाऱ्या वातावरणाशी संबंधित आहेत. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत भारत आणि चीन या दोन देशांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतात, दरवर्षी सुमारे 2.4 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर चीनमध्ये सुमारे 2.2 लाख लोकांना प्रदूषणामुळे जीव गमवावा लागतो. प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत उद्योगावर अवलंबून असलेल्या टॉप 10 देशांमध्ये अमेरिका हा एकमेव देश आहे. अमेरिकेत 2019 मध्ये 1,42,883 प्रदूषण-संबंधित मृत्यू असून अमेरिका जगात सातव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर बांगलादेश आणि इथिओपिया यांचा नंबर लागतो.