मुंबई राजमुद्रा दर्पण | जगातील महत्वाच्या शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर आज देशातील इतर बाजारांमध्ये घासरण नोंदवली गेली. अमेरिकेच्या बाजारात झालेल्या जोरदार विक्रीचा प्रतिध्वनी आज सकाळी उघडलेल्या आशियाई बाजारात उमटले आहेत.
बाजार उघडताच बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 950 इतक्या अंकांनी घसरून 53250 स्तरावर व्यवहार करीत होते तर एनएससी निर्देशांक निफ्टीमध्ये 280 इतक्या अंकांची घसरण नोंदवण्यात आली असून 15960 च्या स्तरावर व्यवहार करीत आहे.
जागतिक पडझडीमुळे देशातील शेअर बजारतदेखील पडझड पाहायला मिळाली आहे. चालू आठवड्यात मंगळवारी बाजाराने मोठी उसळी घेतली होती.
त्यामुळे शेअर बाजार पुन्हा एकदा सतरा हजाराने मार्गक्रमण करेल अशी आशा निर्माण झाली होती. पण आज या तेजीला पुन्हा मोठा ब्रेक लागला आहे.