नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | राजकारणी आणि माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धूला सर्वोच्च न्यायालयान एक वर्षाची कोठडी सुनावली आहे. 1988 साली केलेल्या मारहाणीत गुरुनाम सिंह या वृद्धाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जुन्या निकालात न्यायालयाने निव्वळ 1 हजार रुपयांचा दंड सुनावला होता. यावेळी पुर्नविचार याचिका दाखल केल्यानंतर हा निर्णय बदलू सर्वोच्च न्यायलयाने आता 1 वर्ष कारागृहाची शिक्षा सुनावली आली आहे. सुमारे 34 वर्षांपूर्वी घडलेल्या रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची ही शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, याधी याप्रकरणात त्याला केवळ 1000 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.
पतियाळा येथे 27 डिसेंबर 1988 रोजी दुपारी किरकोळ वादातून 25 वर्षीय नवज्योतसिंग सिद्धूने गुरनाम सिंह (65) यांच्या डोक्यात ठोसा मारला होता. त्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झाला.त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात मृत्यूचे कारण डोक्याला दुखापत आणि हृदयविकाराचा त्रास असल्याचे सांगण्यात आले.