मुंबई राजमुद्रा दर्पण | आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात काही कलाकार आहे आहेत जांची नुसती नाव जरी घेतली तरी नकळत हसू येते. असच एक नाव म्हणजे विशाखा सुभेदार. चित्रपट असो अथवा एखादा कार्यक्रम, विशाखाची विनोदी फटकेबाजी कायमच प्रेक्षकांचे मन जिंकते आणि त्यांना खळखळून हसवते. इतकेच नव्हे, तर धीरगंभीर भूमिकांनाही ती तितक्याच ताकदीने सादर करते.
एक कलाकार जेव्हा मोठा होत असतो तेव्हा त्याच्या पाठीशी अनेक गोष्टींचे पाठबळ असते. विशाखाच्या पाठीही असेच बळ आहे. पण सध्या विषाखला मानसिक ताणाचा सामना करावा लागतोय.जीव नकोसा झाला आहे… असं म्हणत विशाखाने नुकतीच सोशल मीडियावर लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. आजवर अनुभवलेल्या काही आव्हानांना तिने वाचा फोडली. विशाखाने केलेली ही पोस्ट वाचल्यानंतर एक प्रेक्षक म्हणून तुम्हीही विचारात पडाल. कारण, ज्या कलाकारांकडून तुम्ही दर्जेदार कामाची अपेक्षा करता त्याच कलाकांना इतकं काही पाहावं लागत असेल, तर आपण एक प्रेक्षक म्हणूनही कुठेतरी अपयशी ठरलो आहोत हेच स्पष्ट होत आहे.
” कुर्रर्रर्रर्र ” या नाटकाच्या प्रयोगानंतर ज्या प्रसंगांचा समना केला त्याला तिनं शब्दांत मांडलं. बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे नाट्यगृहांमध्ये सादरीकरणानंतर तिला प्रचंड मनस्ताप झाला. कुठे शौचालयं स्वच्छ नव्हती, तर कुठे ग्रीन रुममध्ये बसण्यासाठी सोयही नव्हती. लाईटच नाही, एसी चालतच नाही, ग्रीन रुममध्ये पाहवतही नाही असंच चित्र डोळ्यासमोर अकाच ठिकाणी नाही तर इतर ठिकाणीही हीच अवस्था , त्यातच नाटक सादर करणे म्हणजे परीक्षाच. अशा या परिस्थितीमध्ये कुणाचाही संताप अवरणे कठीणच असते. विशाखा सोबत असच घडले. तिच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि सर्वांनाच खडबडून जागे केले.