यावल राजमुद्रा दर्पण | यावल मधील अभयारण्यात प्राण्यांची गणना करण्यात आली आहे. यावेळी या अभयारण्यात एकही वाघ दृष्टिस पडला नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून प्राणी गणना बंद होती. यंदा दोन वर्षांनी प्राणी गणना झाली यावेळी एकाही वाघाचे दर्शन झाले नाही.
मात्र पाल, जामन्या वन क्षेत्रात बिबट्या यांचा वावर दिसून आला. दोन वर्षांपूर्वी केलेल्या प्राणी गणानेच्या तुलनेत काही प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली. यंदा वाघ न दिसल्याने वन क्षेत्राच्या सुरक्षेसंदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्राणी गणनेसाठी शहरातील अनेक निसर्गप्रेमी वनक्षेत्रात गेले होते. सोमवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी यावल अभयारण्यामध्ये वन्य प्राण्यांची गणना घेण्यात आली. त्यात प्राणी गणनेसाठी पाल वनक्षेत्रात १८ तर जामन्या वन क्षेत्रात १५ असे एकूण ३३ ठिकाणी मचाणी बांधण्यात आल्या होत्या. यावेळी रात्री चांगल्यापैकी वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. मात्र दोन वर्षांपूर्वी मचाणावर थांबलेल्या निसर्गप्रेमींना वाघाचे दर्शन झाले होते.
दोन वर्षांनंतर निसर्गप्रेमींना काही वाघ दिसला नाही. वनक्षेत्रात एकूण २३३ वन्यप्राणी आढळले. गेल्या दोन वर्षापूर्वी १८ मे २०१९ ला जामन्या वनक्षेत्रात १९०, तर पाल वनक्षेत्रात १४४ असे एकूण ३३४ प्राणी आढळून आले होते. यंदा दोन वर्षानंतर जामन्या वनक्षेत्रात १६८ तर पाल वनक्षेत्रात १५४ असे एकूण ३२२ वन्य प्राणी निदर्शनास आले आहे.