जामनेर राजमुद्रा दर्पण |तालुक्यातील पहुर ग्रामीण रूग्णालयातील महिला सहकारी डॉक्टरचा विनयभंग केल्या प्रकरणी एकास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व ५ हजार रूपये दंड आकारण्यात आला असल्याचा निर्णय जामनेर कोर्टाने सुनावला.
आरोपी डॉक्टर जितेंद्र वानखेडे हा पहुर ग्रामीण रूग्णालयातील पिडीत महिला सहकारी डॉक्टर दि.२ जुन २०२१ रोजी रात्री कर्तव्यावर असताना आरोपी वानखेडेची त्या दिवशी रात्री ड्युटी नसतानाही मध्यरात्री १२:३० सुमारास आला महिला डॉक्टर आराम करीत असलेल्या कक्षाचा दरवाजा ठोठावुन दरवाजा उघडण्यास सांगुन. माझ्या बायकोचा वाढदिवस असुन. त्या निमित्ताने तुमच्यासाठी खायला आणले.मात्र यास पिडीतेने नकार दिला असता आरोपीने वारंवार खाण्यासाठी आग्रह धरला.यावेळी आरोपी वानखेडे हा दारूच्या नशेत असल्याने. पिडीतेने आणलेले पार्सल ताब्यात घेतले.आरोपीने पुन्हा १ वाजे दरम्यान फोन कॉल करून व्हाट्सएपवर ऑनलाइन यायला सांगितले.आणि रात्रभर मेसेजद्वारे दारू पिण्यासाठी आग्रह करत होता.त्यामुळे इतर सहकारी डॉक्टर यांना पिडीतेने या प्रकाराबाबतीत फोनवर माहिती कळवून त्यांना बोलवुन आरोपीस बाहेर घेवुन जाण्याबाबत सांगितले.
पिडीत महिला डॉक्टर यांनी याबाबत पहुर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी जितेंद्र प्रल्हाद वानखेडे विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली.सदरचा खटला जामनेर कोर्टात न्यायाधीश डी.एन.चामले यांच्या समोर चालला.खटल्यात सरकार पक्षातर्फे एकुण ६ साक्षीदार तपासले.गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उप.निरीक्षक अमोल देवढे यांनी केला होता.सरकार पक्षातर्फे क्रुतिका भट यांनी कामकाज पाहीले.