जळगाव राजमुद्रा दर्पण | जिल्हयात आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसून येत आहे. त्यातच तालुक्यातील मौजे पिंप्री आवार येथील २२ वर्षिय तरुण मंगेश निवृत्ती माळी याने राहत्या घरात दुपारी एक वाजेच्या सुमारास गळफास घेतल्याची दुर्देवी घटना घडली. गळफास घेतल्याचे समजताच ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मयत मंगेश याने केलेल्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात मयताचे काका सुभाष महादु माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगेश याच्या पश्चात आई-वडील व भाऊ आहे. तसेच वर्षभरापुर्वी मोठ्या भाऊचे दुर्देवी निधन झाले होते. या दुःखद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.