मुंबई राजमुद्रा दर्पण | गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्यासोबत एक विचित्र घटना घडली आहे. त्यावर त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हिने अशी प्रतिक्रिया दिली की त्याचीच सर्वात जास्त चर्चा होत आहे. लाइव्ह मॅचमध्ये हार्दिक सोबत एक विचित्र घटना घडली. त्यामुळे पत्नी नताशा हिने असे हावभाव केले की त्यामुळे नक्की काय झाले, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आता नताशाच्या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा होत आहे. याचा फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध गुरुवारी खेळल्या गेलेल्या IPL सामन्यात गुजरात टायटन्स (GT) संघाला 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) कर्णधार हार्दिक पांड्यासोबत एक घटना घडली, ज्यानंतर त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकनेही अशी काही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, गुजरात टायटन्स (GT) डावाच्या 10व्या षटकात हार्दिक पंड्या क्रीजवर होता आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल त्याच्यासमोर गोलंदाजी करत होता. 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शॉट खेळत असताना हार्दिक पांड्याची बॅट हातातून सुटली आणि ती स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने पडली.
हा सर्व प्रकार घडला तेव्हा नताशा स्टॅनकोविक स्टेडियममध्ये बसलेली होती. हा सर्व प्रकार पाहून नताशा स्टॅनकोविक आश्चर्यचकित झाली. नताशा स्टॅनकोविकने पुन्हा धक्कादायक प्रतिक्रिया दिली आणि हातवारे करुन म्हणाली की असे काय झाले ?