मुंबई राजमुद्रा दर्पण | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी अयोध्येत गेले होते. त्यानंतर कोरोना काळामुळे अयोध्येला जाऊ शकलो नव्हतो. पण, कुणी दौरा रद्द केला असला तरी आदित्य ठाकरे आणि आम्ही १५ जूनला अयोध्येत जाणार आहोत, असे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात रामाचे राज्य आणण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. त्यासाठी आम्ही अयोध्येला जात आहोत. आम्ही तेथे शक्तीप्रदर्शनास नव्हे तर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. असेही राऊत बोलले आहे. इतर पक्षाने जे काही कार्यक्रम ठरवले ते त्यांनी रद्द केले. ते का रद्द केले आम्हाला माहीत नाही. परंतु, त्यांना काही सहकार्य लागले असते तर ते आम्ही नक्कीच केले असते. अयोध्या किंवा उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे. तिथे नेहमीच शिवसेनेचे स्वागत केले जाते. त्यामुळे कुणाला दर्शन घेण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्यास आम्ही नक्की मदत करू, असा टोला त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला.
अयोध्या दौरा रद्द करण्यामागे काय अडचणी आहेत ते माहित नाही. पण, भाजपने असे का करावे? भावन प्रत्येक वेळेला महाराष्टातील नेत्यांना वापरून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. आपण वापरले जातोय हे काही लोकांना उशिराने समाजात, त्यांना ते लवकर समजणं अत्यावश्यक आहे, यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं होतंय, असे राऊत म्हणाले.