मुंबई राजमुद्रा दर्पण | आता शिवसेना राज्यसभेत सहावी जागा लढवणार म्हटल्यावर उमेदवार कोण हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये या निवडणुकीसाठी चढाओढ दिसून येत आहे. अद्याप कोणीही आपले उमेदवार जाहीर केले नसून, शिवसेनेतून मात्र तीन नावांची चर्चा सुरु झाली आहे.
महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. यात शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 106 आमदारांस, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार असे एकूण 113 आमदार आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. यानुसार शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एक आणि भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे समजताच संभाजीराजेंचे नाव आघाडीवर आहे. तर संभाजीराजेंच्या नावाव्यतिरिक्त शिवसेनेत औरंगाबादचे चंद्रकांत खैरे आणि शिरूरचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत.