चंद्रपूर राजमुद्रा दर्पण | आजची सर्वात मोठी बातमी. चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर येथे अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर ट्रकचा टायर फुटून अपघात झाला. टायर फुटल्यानंतर आहेच भडका उठला.अजयपूर गावाजवळ काल रात्री हा भीषण अपघात झाला.
पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर भीषण आग लागली. आग लागल्याने ट्रकचे टायर फुटले. त्यानंतर आग भडकली. ही भीषण आग मूल-चंद्रपूर अग्निशमनाच्या पथकांने विझवली. आगीमुळे मृतदेह जळल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस दल तपास करत असून या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची पोलिसांनी सांगितले आहे.
आगीमुळे मृतदेह राख झाल्याची धक्कादायक दृश्ये नजरेस पडली. प्लास्टिक पोत्यांमधून हे मृतदेह चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. यातील टँकरमधील चालक अमरावती निवासी हाफीज खान आणि वाहक वर्धा निवासी संजय पाटील यांचा मृतांमध्ये समावेश आहे. तर लाकूड भरलेल्या ट्रकमधील 7 जणांची अपघातात राख झाली आहे. ट्रकमधील 7 जण बल्लारपुर तालुक्यातील नवी दहेली आणि कोठारी गावचे रहिवासी आहे. हा भीषण अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट नसून पोलिस तपास करत आहे.