यावल राजमुद्रा दर्पण | जिल्हयात पुन्हा चोरीची घटना. चोरांना कायद्याचा धाकाच राहिलेला नाही. यावल तालुक्यातील साकळी येथील श्री वाडेश्वर मंदिरातील पितळी घंटा चोरांनी उडवून नेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या पितळी घांत्याची किंमत 9 हजार रुपये इतकी होती.
साकळी येथे मनवेल रस्त्यावर श्री वाडेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिरात प्रवेशद्वाराच्या समोर गणपतीच्या मुर्तिजवळ नऊ किलो वजनाची पितळी घंटा लावली होती. गुरुवारी सकाळी भाविक मंदिरात गेल्यावर ही घंटा चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे मंदिर प्रशासनाने कळवले. चिरीला गेलेल्या मुद्देमालाची किमत सुमारे ९ हजार रुपये इतकी आहे. यापूर्वी देखील मनवेल रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरातील पितळी घंटा चोरीला गेली होती.