जळगांव राजमुद्रा दर्पण | सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झालेली पाहायला मिळाली. जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी १० ग्रॅम सोन्याच्या भावात ३३० रुपयाची वाढ झाली असून, दुसरीकडे चांदी देखील वाधरली आहे. काल झालेल्या घसरणीनंतर आज चांदीचा प्रति किलोचा दर ८१० रुपायांनी वाढला. काल सकाळी सोने ५० रुपयांनी महाग झाले होते तर, चांदी ३९० रुपयांनी स्वस्त झाली होती.
जळगांव शहरातील आजचा सोने चांदीचा भाव किती?
आज सोन्याचा प्रती तोल्यामागे ५१,७३० रुपयांचा भाव आहे. तर चांदीचे दर प्रति किलो मागे ६३,०१० रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर हे दिवसातून दोन वेळा जाहिर केले जातात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायकांळच्या वेळेस. त्यामुळे सोन्याच्या दरात चढउतार जाणवतो. गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भवामध्ये चढउतार दिसून येत आहे.
देशात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. विवाह समारंभात दागिन्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे सध्या देशात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. त्यात गेल्या मागील १५ ते २० दिवसात सोने आणि चांदीचे दर घसरताना दिसून आले.
१ मे रोजी ५२,५०० रुपायांवर असलेला सोन्याचा दर गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी ५१ हजार रुपायांवर आला होता. तर दुसरीकडे चांदी ६५,५०० रुपयांवरून दोन ते तीन दिवसापूर्वी ६१ हजारांवर आली होती. मात्र या चालू आठवड्यात चांदी चार वेळा महाग तर एक वेळा स्वस्त झाली आहे. यात पाच दिवसात चांदी तब्बल ३ हजार रुपयांनी महागली आहे. तर सोने ६०० ते ७०० रुपयांनी महागले आहे.
या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
१६ मे २०२२- रुपये ५१,०४० प्रति १० ग्रॅम
१७ मे २०२२ – रुपये ५१,४३० प्रति १० ग्रॅम१७
१८ मे २०२२ – रु ५१,३५० प्रति १० ग्रॅम
१९ मे २०२२ – रु ५१,४०० प्रति १० ग्रॅम
या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
१६ मे २०२२- रुपये ६०,७२० प्रति किलो
१७ मे २०२२ – रुपये ६२,३५० प्रति किलो
१८ मे २०२२- रुपये ६२,५९० प्रति किलो
१९ मे २०२२- रुपये ६२,२०० प्रति किलो
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते. सोने खरेदी करतांना या सर्व बाबई लक्षात असणे आवश्यक असते.