अमळनेर राजमुद्रा दर्पण | एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने प्रेमसंबंध ठेऊन हा सर्व प्रकार करण्यात आला असल्याचे समजते.
अमळनेर शहरातील एका भागात १७ वर्षीय मुलीचा विवाह ठरला आहे. ती अठरा वर्षाची असताना तिचा विवाह करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या दरम्यान, संबंधीत तरूणीने गांधीलपुरा भागातल्या मेहतर कॉलनीतील कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले याने धमकी देवून अत्याचार केल्याची माहिती आपल्या कुटुंबाला दिली. त्याला रवी उर्फ रघूभाई घोगले मदत करायचा. तर तसेच नेहमी धमकी द्यायचा असेही तिने सांगितले. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी घोगले याने ‘ मी तुझ्या घरातील लोकांना मारून टाकेल ‘ अशी धमकी दिली, अशीही तक्रार दोघांविरुद्ध पोलिसात करण्यात आली आहे. या अनुषंगाने याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कुणाल उर्फ आण्णा देवा घोगले आणि रवी उर्फ रघूभाई घोगले या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.