पाचोरा राजमुद्रा दर्पण | पाचोरा शहरातील आखतवाडे येथे एका ३५ वर्षीय इसमाचा पाय घासरून तो विहिरीत पडल्याची घटना समोर आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील रविंद्र रामा गढरी (वय ३५) हे दि. २०मे रोजी त्यांचे शेतात जात असताना अचानक त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. सर्व प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच रविंद्र गढरी यांना विहिरीतून बाहेर काढून तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी रविंद्र गढरी यांना मृत घोषित केले.
संबंधित घटने प्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमोल पाटील हे करीत आहे. मयत रविंद्र गढरी यांचे पाश्चात्य आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.