जामनेर राजमुद्रा दर्पण | जामनेर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना,युवा सेना आणि सर्व शिवसेना अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिक,युवा सैनिक यांना कळविन्यात येते की आपले पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक असावा त्याबरोबरच शिवसेना गावागावात पोहचावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
यासाठी आपल्या जामनेर विधानसभा मतदारसंघात उत्तर महाराष्ट्र नेते आदरणीय सजंय राऊत साहेब,उत्तर महाराष्ट्र समन्वयक आदरणीय रविंद्र मिर्लेकर साहेब आणि रावेर लोकसभा संपर्कप्रमुख श्री.विलास पारकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दी.२५ मे ते २८ मे २०२२ या कालावधी मध्ये शिवसंपर्क अभियान चे नियोजन करण्यात आले आहे.
शिवसंपर्क अभियान साठी आपल्या विधानसभेमध्ये श्री.अण्णासाहेब पतंगे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे.तरी कृपया सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संपर्क अभियान राहावे असे आवाहन तालुका संपर्क नेते श्रीकांत पाटील (मुंबई) शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील शिवसेना प्रवक्ते गणेश पांढरे आदींनी केले आहे.