चंद्रपूर राजमुद्रा दर्पण | चंद्रपूरच्या जंगलात जुनाबाई वाघिणीचा दरारा पाहाला मिळाला. जंगली कुत्र्यांनी या वाघिणीचा पाठलाग करून तिचा शिकार पळवण्याचा प्रयत्न केला आहे.
20 कुत्र्यांच्या गटाने जुनाबाईला सुरुवातीला खूप हैराण केले. नंतर मात्र जुनाबाई या रानकुत्र्यांवर धावून आली आणि रान कुत्र्यांनी तिथून पळ काढला.. जंगलातल्या शिकारीची ही दुर्मीळ दृश्य वन्यजीवप्रेमी शैलेंद्र भोयर यांनी कॅमेऱ्यात चित्रित केली आहे. अत्यंत चपळ आणि दुर्मिळ असलेल्या रानकुत्र्यांचे वाघिणीचे लक्ष विचलित करुन तिची शिकार पळविण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरून वाघिणीला भंडावून सोडण्यासाठी रानकुत्रे सरसावले होते.
मात्र रानकुत्र्यांवर चाल करुन पुढे आलेल्या वाघिणीला बघताच त्याचक्षणी कुत्र्यांनी तिथून पळ काढला. 20 कुत्र्यांच्या गटाने वाघिणीला घेरण्याचा प्रयत्न फसला. जुनाबाई दमदार पावले टाकत पुढे आल्यावर पाणवठा सोडून रानकुत्रे पळाले. आजवर कधीही कॅमेऱ्यात कैद न झालेले दृश्य चंद्रपूरचे वन्यजीवप्रेमी शैलेंद्र भोयर यांनी स्वनजरेने पाहिले आणि अनुभवले. शत्रूला योजनाबद्ध पद्धतीने पळवाट असणारी रानकुत्री जुनाबाईच्या ठाम पवित्र्यांनी ती जंगलात दिसेनाशी झाली आहे, अखेर वाघच जंगलाचा राजा असतो या प्रसंगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.