मुक्ताईनगर राजमुद्रा दर्पण | वेग नियंत्रणाचे फलक महामार्गावर लावलेले नसतांना महामार्ग पोलिस मात्र वेग नियंत्रणाची समज देत कारवाईसाठी बोहर्डा-बोहर्डी गावाजवळ पोलिस पथक कारवाई करत होते. या भागातून जाताना आमदार चंद्रकांत पाटील यांना हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यांनी पथकाजवळ थांबून ही मनमानी थांबवा. जर किती वेगाने वाहन चालवावे, याबाबत माहिती देणारे फलक नाही तर कारवाई कशाच्या आधारे करत आहात? असा जाब विचारला.
आमदार चंद्रकांत पाटील हे मतदार संघात जात असताना. त्यांना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील मुक्ताईनगर ते जळगाव दरम्यानच्या रस्त्यावर बोहर्डा-बोहर्डी गावाजवळ वाहतूक पोलिस नियंत्रकांची गाडी थांबली होती. या वाहनातील स्पीड गनद्वारे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची नोंद सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे आमदारांनी स्वत:चे वाहन थांबवून पथकाला सुरू असलेल्या कारवाईबाबत जाब विचारला. मूळात महामार्गावर वाहनांना वेग मर्यादेचे सूचना फलक कुठेही लावलेले नाही. त्यामुळे वाशन चालकांना माहिती नसते आणि त्यांना थेट ऑनलाइन दंडाचा मेमो पाठवला जातो. हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी चर्चा केली.