जळगाव राजमुद्रा दर्पण | चाकरमान्यांसाठी सोयीची असलेली भुसावळ ते इगतपुरी पर्यंत जाणारी मेमु गाडी पुढील आठवड्यात चार दिवस नाशिक पर्यंतच धावणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे प्रवाशाची गैरसोय होणार असून काही दिवसांपुर्वी सुरू झालेली भुसावळ– इगतपुरी मेमुला काही दिवसांचा ब्रेक लागणार आहे.
इगतपुरी रेल्वे यार्डात रेल्वे प्रशासनातर्फे २८ मे ते १ जून या दरम्यान तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ही गाडी नाशिकपर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे चार दिवस प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. या तांत्रिक कामामुळे मनमाडहून मुंबईकडे जाणारी एक्स्प्रेस उशिराने धावू शकतात; असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर मेमू गाडी ही नेमहीच्याच वेळेवर सुटेल.