पुणे राजमुद्रा दर्पण | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 महिन्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याचे समजते आहे. पंतप्रधान 14 जूनला राज्यात येणार असल्याच्या माहिती भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटद्वारे कळवले आहे. देहूत मंदिराच्या लोकार्पणासाठी नरेंद्र मोदी येणार आहेत.
आचार्य तुषार भोसले यांनी 29 मार्चला पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत तुषार भोसले यांनी मोदी यांना आमंत्रण दिले होते. यावेळेस त्यांच्यासोबत देहू संस्थानाच्या विश्वस्तही उपस्थित होते. दिलेले आमंत्रण स्वीकारलं आहे. त्यानुसार आता पंतप्रधान 14 जूनला देहूत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदी याआधी 6 मार्चला पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आले होते.