भारत राजमुद्रा दर्पण | जंगलाचा राजा काही मांजरासारखा शांत नाही किंवा कुत्र्यासारखा पिसाळलेला प्राणीही नाही. तो जंगलाचा राजा आहे. त्याच्यापासन लांब राहण्यातच आपली भलाई आहे. तो जंगलात काय किंवा पिंजऱ्यात असला काय शेवटी सिंह तो सिंहच. हिंस्त्र प्राण्यांच्या यादीत सिंहाचे पाहिले स्थान आहे. मात्र काहीजण हे विसरून सिंहाची टिंगलटवाळी करत असतात, काहींना वाटते की सिंह पिंजऱ्यात आहे तो आपल्याला काहीच करू शकत नाही, पण अस नसते. प्राणी संग्राहलयात सुद्धा प्रत्येक पिंजऱ्याच्या बाहेर सूचना लिहलेल्या असतात. मात्र काही जण या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल हित आहे. या व्हिडीओ मध्ये सिंहाची मस्करी करणे तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.
या व्हिडीओत एक व्यक्ती प्राणी संग्राहलायत येतो. प्राणी संग्राहलयातील सगळ्या पिंजऱ्यांतील प्राण्यांना पाहात तो सिंहाच्या पिंजऱ्या जवळ थांबतो. मात्र याला सिंहासोबत खेळायचे असते. मग तो सिंहा सोबत खेळण्याचा प्रयत्न करु लागतो. पिंजऱ्यात असणाऱ्या सिंहाची मस्करी करण्यात गूंग होतो. कधी तो सिंहाची आयाळ ओढतो. तर कधी सिंहाच्या तोंडात हात घालण्याचा प्रयत्न करतो. हा खेळ बराच वेळ चालू असतो. सिंहाची मस्करी करणाऱ्याला वाटलं असेल, सिंह पिंजऱ्यात आहे. आपल्याला काही करणार नाही. पण शेवटी सिंह तो सिंहच. अखेर सिंहाने संधी साधली आणि त्या तरुणाचे बोटाच धरले. जीवाच्या अकांताने ही तरुण ओरडत होता. आपली पूर्ण ताकद पणाला लावून ती व्यक्ती आपली सुटका करत होती. पण सिंहाच्या ताकदीपुढे त्याची शक्ती कमी पडत होती. सिंह काही बोट सोडायचे नाव घेत नव्हता. अखेर कशीबशी सुटका त्याने करुन घेतली आणि अखेर बोट गमावून बसला.