यावल राजमुद्रा दर्पण | आईच्या पुण्यतिथी निमित्त यावल तालुक्यातील शिवशंभु संघटना युवती जिल्हाध्यक्षा कविता ज्ञानेश्वर पाटील यांनी वृद्धाश्रमात अन्नदान करून उपक्रम राबवला. आईच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांनी आपल्या आईच्या नावाने “हिराई फाऊंडेशन” या नावाने नवीन सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे.
आईच्या स्मृतीदिनी कविता पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील धायरी येथील सूर्योदय वृद्धाश्रमात अन्नदान केले. तेथील वृध्दाश्रमातील वृद्ध महिलांना स्वतः अन्नदान करून करीत आपल्या हाताने घस भरवला. आईच्या पुण्यतिथीच्या पूर्ण दिवस वृद्धाश्रमात घालून आईची आठवण काढली. या उपक्रमाप्रसंगी सूर्योदय वृद्धाश्रमच्या संस्थापिका छाया भगत, राधा लाटे यांची उपस्थिती होती. कविता पाटील यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.