यावल राजमुद्रा दर्पण | शहरात पाईप लाईनच्या दुस्तीच्या कामासाठी खड्डे खोदून ठेवलेले आहे. हे खड्डे तात्काळ बुजविण्याची गरज असताना अजूनपर्यंत खड्डे जैसे थे तसेच आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत आहे. प्रत्येक प्रभागात अनेक ठिकाणी रस्ते साफसफाई आणि गटारी साफसफाई करण्यासह ओला व सुका कचरा वाहतूकमध्ये होणाऱ्या प्रक्रियेत मोठा घोळ सुरू असताना लोक प्रतिनिधी व विविध संघटना गप्प असल्याने नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळ नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.
नगरपरिषदेतर्फे पूर्वेकडील विकसित भागात पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकामासह नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. ही कोट्यावधीची कामे करताना संबंधित यंत्रणेने सोयीनुसार ठेकेदाराच्या नावाखाली टक्केवारी हडप केल्याने ठेकेदाराने त्याच्या सोयीनुसार आणि मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे काम न केल्यामुळे विकसित भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा संबंधित ठेकेदार जागो जागी खड्डे खोदून पुन्हा पाईप लाईन दुरुस्तीचे काम करीत आहे. ही कामे करताना भर रस्त्यावर पुन्हा खड्डे खोदण्यात येत आहे.
खड्डे खोदल्यानंतर आठ ते पंधरा दिवस पाईप लाईन व्हाल दुरुस्तीचे काम होत नसल्याने रहदारी करणाऱ्या नागरिकांना. वाहनधारकांना, रहिवाशांना मोठा अडथळा निर्माण होऊन त्रास सहन करावा लागत आहे. तरीही लोक प्रतिनिधी व विविध संघटना शांत बसल्यामुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत असून यावल आर्थिक भोंगळ, बोगस कारभारास जबाबदार कोण? असे प्रश्ननही उपस्थित होत आहे.