पारोळा राजमुद्रा दर्पण | तालुक्यात करमाड येथे एका निराश शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. उपचारा दरम्यान या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.
मुमताज रतन राठोड (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मुमताज हा आपल्या आईसोबत शेतात काम करत हाेता. काम करत असताना मुमताज याने शेताच्या बाजुला जावून विषारी औषध प्राशन करून अखेरचा श्वास घेतला. मुमताजला पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत भीमा राठोड यांच्या माहितीवरुन घटनेची नाेंद करण्यात आली आहे.