बोडवड राजमुद्रा दर्पण | तालुक्यातील तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांनी लाखोंचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड तालुक्यातील शेलवड, सुरवाडे बुद्रूक, विचवा आणि मुक्तळ या चार गावांचा कार्यभार असताना तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांनी १४ आणि १५ व्या वित्त आयोगाच्या रकमेतून ५२ लाख ९४ हजार १८० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी रविवारी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बोदवड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश सपकाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. या गुन्ह्यात शेलवडमधील अपहारप्रकरणी माजी सरपंच देखील आरोपीच्या पिंजऱ्यात आहे.
बोदवड तालुक्यातील शेलवड, सुरवाडे बुद्रूक, विचवा व मुक्तळ या ग्रामपंचायतींमध्ये ३० डिसेंबर २०१८ ते १७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीदरम्यान तत्कालीन ग्रामसेवक संदीप निकम यांनी केलेल्या अनियमिततेबाबत तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्याची चौकशी झाली नाही. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकार्यांना निलंबित केले होते.