जळगांव राजमुद्रा दर्पण | जळगावात चोरट्यांचा कहर वाढतच चालला आहे. दि.२१रोजी शहरातील चंदू आण्णानगरात रहिवासी असलेले परशुराम यशवंत पाटील (वय ४२) यांची गोलाणी मार्केट येथील पूजा ऑप्टिकल या दुकानासमोर उभी दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदू आण्णानगरात परशुराम यशवंत पाटील हे पत्रकार आहेत. गोलाणी मार्केट येथे त्यांचे कार्यालय आहे. परशुराम पाटील हे १६ मे रोजी कार्यालयात आले. यादरम्यान सकाळी १०:४५ वाजेच्या दरम्यान त्यांनी त्यांची एम.एच.१९ बी.एच.२८८१ या क्रमांकांची दुचाकी नेहमीप्रमाणे गोलाणी मार्केट येथील पूजा ऑफ्टिकल या दुकानासमोर उभी केली. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांना आपली दुचाकी जागेवर नसल्याचे समजले. चार ते पाच दिवस सगळीकडे शोध घेऊनही दुचाकी सापडून आली नाही. अखेर परशुराम पाटील यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन शनिवार, २१ मे रोजी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे हे करीत आहेत.
गोलाणी मार्केटमधील अनेक दुकानदारांकडे सीसीटीव्ही आहेत. रोजच गाड्या चोरीला ज्याचे प्रकरण असल्यामुळे पोलिसांना त्या फुटेज द्यावा लागतात. यासाठी नको ती भानगड म्हणून व्यापाऱ्यांनी हे सीसीटीव्ही खाली करून दुकानापर्यंत मर्यादीत ठेवले आहे. याठिकाणी प्रत्येक विंगमध्ये दर्शनी भागात दुकानदारांनी कॅमेरे बसविले आहे. जेणेकरून दुकानाचे संरक्षण होईल त्याचबरोबर चोरट्यांवरही अंकुश राहील. यामुळे प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी करण्यात येत आहे.