केदारनाथ राजमुद्रा दर्पण | अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या केदारनाथ धाम ची कवाड अखेर उघडण्यात आली आहे. या केदारधामाला भेट देण्यासाठी भक्तवासियांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. पण, आता मात्र परिस्थिती अवघ्या काही दिवसांतच बदलताना दिसत आहे.
हवामान खात्याने येथील परिसरात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा देत यंत्रणांना सतर्क केले. या इशाच्यानंतर रुद्रप्रयागपासूनच्या भागात पावसाचा तुफान मारा पाहायला मिळत आहे. हवामानात अचानकच झालेल्या बदलांमुळे केदारनाथ यात्रा तूर्तास थांबवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने रुद्रप्रयाग ते गौरीकुंडपर्यंत भक्तांना थांबवून तेथे यात्रेला थांबवून ठेवण्यात आले आहे.
सध्याच्या घडीला यात्रा गौरीकुंड, सोनप्रयाग, गुप्तकाशी, अगस्त्यमुनी आणि रुद्रप्रयाग येथे यात्रा थांबवण्यात आली आहे. रुद्रप्रयाग ते गुप्तकाशी पर्यंत ठिकठिकाणी जवळपास 5 हजार यात्रेकरुंना थांबवण्यात आलं आहे. सोमवारी देखील फक्त एकच तासासाठी यात्रा सुरू करण्यात आली होती. सोनप्रागहून सकाळी 8 वाजेपर्यंत 8530 यात्रेकरुंना रवाना करण्यात आले. पण, प्रशासनाचे आदेश येताच तात्काळ यात्रा थांबवण्यात आली. परिणामी सोनप्रयाग मध्ये 2000 आणि गौरीकुंड मध्ये 3200 यात्रेकरुंना आहे त्या ठिकाणी थांबण्यास सांगितले आहे.