मुंबई राजमुद्रा दर्पण | महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. पेशाने शिक्षक असलेली व्यक्तीच विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून उमेदवार असणार आहे. याबाबतची शिफारस केंद्रीय निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. यामागचे नेमके कारण काय, चला जाणून घेऊया!
शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून जाणारी व्यक्ती पेशाने शिक्षकच असावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जातेय. विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य आणि अकोल्यातील शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. संजय खडक्कार यांनी 2019 पासून या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला.
राज्य निवडणुक आयोगाला वारंवार पत्र लिहून मागणी केली आहे. त्यानुसार आता केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाकडून पत्र पाठवण्यात आलेला आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातून फक्त शिक्षक असलेलीच व्यक्ती उमेदवार असावी, अशी मागणीही आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेले आहे.