कोल्हापूर राजमुद्रा दर्पण | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने सहावा उमेदवार जाहीर केला आहे. तसेच या उमेदवाराच्या अद्याप पर्यंत शिक्कमोर्तब झालेला नसून ज्यावेळेला शिक्कामोर्तब होईल तेव्हा त्या उमेदवाराची घोषणा करण्यात येईल. असे असताना आताच एक मोठी बातमी समोर आली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी सकाळी आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे, अशी माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर संभाजीराजे छत्रपती हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संभाजीराजे कोल्हापूरहून मुंबईला निघाले आहेत. आज सायंकाळी मुख्यमंत्री आणि संभाजीराजे याची भेट होणार असल्याची माहिती मिळतेय.
या भेटीत संभाजीराजे याच्या अपक्ष उमेदवारीबाबत शिक्कामोर्तब होईल अशी माहिती मिळाली आहे. संभाजी राजे काही केल्या शिवसेनेत प्रवेश घेणार नाही. त्यामुळे त्यांना शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याला संभाजीराजे देखील सकारात्मक प्रतिसाद देवून शिवसेनेचा पाठिंबा स्वीकारतील असे बोलले जात आहे. मात्र याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यावरच काय तो निर्णय घेण्यात येणार आहे.