राजमुद्रा वृत्तसेवा | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बोदवड़ शहरासाठी तात्काळ स्वतंत्र पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, बोदवड़ तालुका व शहरतर्फे निवेदन देण्यात आले. काल देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना हे निवेदन देण्यात आले.
“आपण मुख्यमंत्री असतांना बोदवड तालुक्यासाठी पाणीपुरवठा योजनेकरिता ४२ कोटी रुपये निधी मंजूर केलेला असून ती योजना संथ गतीने काम चालू आहेत. संबंधित ठेकेदार किंवा लोकप्रतिनिधी हे त्या मध्ये लक्ष घालत नाहीत. त्यामुळे योजनेचे काम अपूर्ण स्थितीत आहे. परिणामी बोदवड तालुक्याला २५ ते ३० दिवसाच्या फरकाने पाणी पुरवठा होत आहे.
तसेच महराष्ट्रातिल जळगांव जिल्हाकडे एक सधन व सुपीक जिल्हा म्हणून बघितले जाते, मात्र या १५ तालुक्याच्या जिल्ह्यात मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड हा एक असा दुष्काळी, दुर्लक्षीत तालुका आहे जो स्वातंत्र्याच्या ७५ वर्षा नंतर ही केवळ थेंब भर पिण्याच्या पाण्यासाठी हात पसरून भीक मागतोय.” असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच “बोदवड परिसरात सिंचनाचा अभाव, उद्योग धंद्यांचा अभाव व जवळ जवळ ९०% जनतेचे उपजीविकेचे एकमेव साधन म्हणजे शेती व मोल मजुरी, त्यात सततच्या पाणी संकटामुळे बोदवड शहर व तालुका दिवसागणित ओस पडत चालला आहे. शहरात नगरपालिका स्थापन होऊन जवळ जवळ ४२ महिने झालीत तरी, जनतेची पाण्याविषयीची अपेक्षा ५ पैशाची देखील पूर्ण होऊ शकली नाही. आजही बोदवड शहर ODA पेय जल योजनेच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या ओंजळीचे पाणी पीत आहे. जिला कार्यन्वित होऊन जवळ जवळ २५ वर्ष पूर्ण झालीत व २००६ साली ती कालबाह्य देखील झाली. तरी त्या जीर्ण झालेल्या योजनेवर आजही ८१ गावाची तहान अवलंबून आहे. त्यामुळे कधी ती फुटते तर कधी तांत्रिक बिघाड होतो, हे सर्व १५ वर्षा पासून सतत सुरू आहे तरी आधीची ग्राम पंचायत व आताची बोदवड नगरपंचायत व लोकप्रतिनिधी कायम स्वरूपी यावर मार्ग काढू शकले नाहीत. बोदवड शहरात ठेके व टेंडर साठी भांडणार्या लोकप्रतिनिधींना कोणी कधी पाण्यासाठी भांडताना पाहिले नाही. ज्यांच्या वर शासनाने व जनतेने जबाबदारी दिली होती ते बोदवडच्या जनतेला चितेवर मरणासन्न अवस्थेत ठेऊन त्यांच्या टाळू वरच लोणी खात आहेत. तरी एकात्म मानव वाद व अंत्योद्ययाच्या वाटे वर मार्गस्थ असणाऱ्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून आम्हाला न्याय द्याल व २२ वर्षापासून तहानलेल्या बोदवडकरांची तहान भागवाल. यासाठी तुम्ही आमच्या शहराच्या समस्या विधानसभे मध्ये मांडाव्यात आणि त्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या.” अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यासाठी बोदवड शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठ्याची योजना मंजूर व्हावी व
बोदवड तालुक्यासाठी मजूर योजना त्वरित कार्यान्वित व्हावी, अशी भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका व शहराच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना विनंती करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा जिल्हाकोषाध्यक्ष अनिल खंडेलवाल, भाजपचे जेष्ठ मार्गदर्शक अंनता कुलकर्णी, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटिल,भाजपा तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, भा.ज.पा जिल्हासरचिटणीस सौ. अनिता अग्रवाल, भाजपा चित्रपट कामगार आघाडी तालुकाध्यक्ष उमेश गुरव,भाजपा शहराध्यक्ष नरेश आहूजा, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, सोशल मिडिया तालुकाप्रमुख रोहित अग्रवाल, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, नाडगांव गण प्रमुख सुधीर पाटिल, गणेश शर्मा, मांगीलाल गिल, बुथ अभियान प्रमुख दिलीप घुले, राम आहुजा, पंकज चांदुरकर, भूषण देशमुख, सचिन जैस्वाल, संतोष चौधरी, वैभव माटे, महेंद्र पाटिल आदि पदाधिकारी एवंम कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती तालुका सोशल मीडिया प्रमुख रोहित अग्रवाल यांनी राजमुद्राला दिली.