धरणगाव राजमुद्रा दर्पण |धरणगाव तालुका पाळधी गावात विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध झाली. पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या अनमोल सहकार्याने चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन पदी गोकुळ सिंग पाटील (भटू दादा) तर व्हाईस चेअरमन पदी सामाजिक कार्यकर्ते संजय माळी आणि विद्यमान सदस्यपदी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, रामदास पुंडलिक सपकाळे, शे. मजीद सत्तार, राजेंद्र झावरू चौधरी, गोपाळ शालिग्राम पाटील, वासुदेव पौलाद पाटील, भरत साहेबराव पाटील, नूतन नरेंद्र कुलकर्णी, सुनंदा कैलास धनगर, गोकुळसिंग प्रल्हाद पाटील, भावलाल गोविंदा ननवरे यांची निवड झाली.
सदर निवडणुकीचे काम निर्णय अधिकारी ए. टी. नदवाड यांनी पाहिलं. तसेच संस्थेचे सचिव अनिल पाटील आणि क्लर्क पांडुरंग कुलकर्णी यांनी देखील सहकार्य केले. या निवडीबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे.