जळगांव राजमुद्रा दर्पण | वाकोद शेतकरी खरीपूर्व मशागतीसाठी सुसज्ज झाले असून जोरदार कामाला लागले आहे. परंतु कांद्याचा भाव इतका घसरला आहे की मिळालेल्या उत्पन्नातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे खरीप पिकांसाठी आर्थिक नियोजन कसे कराववे, या चिंतेत शेतकरी सापडले आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत.
वाकोद येथील राजू शिरसाठ यांनी कांदा लागवड केली. त्यांना जवळपास ५० क्विंटल कांद्याचे उत्पन्न मिळाले. परंतु, कांद्याचे भाव घसरल्यामुळे कांदा घ्यायला कोणीही तयार होत नाही. तर वाढत्या उष्णतेमुळे खराब व सडलेला निम्मे कांदा फेकावा लागला आहे. कांद्याच्या लागवडीसाठी त्यांना एकूण 60 हजार रुपये इतका खर्च आला होता. परंत, परंतु 60 हजाराच काय, खर्चाचे निम्मे उत्पन्न सुद्धा मिळालेला नाही. तर हा खर्च भागवताना शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आगामी खरिपाचे नियोजन कसे करावे, ही समस्या आता शेतकऱ्यांपुढे उभी राहिली आहे.सध्या कांदा हाच एकमेव आर्थिक स्रोत देणारा घटक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हजार रुपये बाजार भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु व्यापारी हजार रुपये क्विंटल सुद्धा कांदा घेण्यास तयार नाही.