धरणगाव राजमुद्रा दर्पण | किरकोळ वादातून, दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २० व २२ रोजी धरणगाव तालुक्यातील संजय नगर जुनी पोलिस लाईन जवळ घडली. याप्रकरणी १२ जणांविरुद्ध विनयभंग, ऑट्रासिटीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिली.
छायाबाई भिल (वय ४२, रा. संजयनगर, जुनी पोलिस लाईन जवळ) दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक २० मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गल्लीतील रेखाबाई महाजन ही महिला जात असतांना ती शिवीगाळ करत होती. यावेळी छायाबाई आणि त्यांची आई जनाबाई यांनी कुणाला शिवीगाळ करताय असे विचारले. तेव्हा रेखाबाई यांनी मी दुसऱ्या बाईला शिवागाळ करते आहे, असे बोल्यावर दोघांमध्ये वाद झाला. यानंतर रेखाबाई यांची दोन्ही मुले आकाश महाजन, सागर महाजन यांना शिवीगाळ केली. छायाबाई यांचा भाऊ मानसिंग याने जातिवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच पाठीवर चाकूने वार केले. याप्रकरणी त्यांच्या वर ऑट्राॅसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या फिर्यादीत मंगलाबाई (नाव बदलेले) यांच्या घराची भिंत पाडण्यावरून २२ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास गल्लीतील एका महिलेसोबत सोबत वादावादी झाली.