भारत राजमुद्रा दर्पण | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेमंत्र्यांनी संसदेत एक एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती म्हणजे रेल्वेत जवळपास दीड लाख पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. रेल्वे वेळोवेळी विभागानुसार भरती प्रक्रिया राबवत असते, असे ते म्हणाले.
भारतीय रेल्वेमध्ये 1.49 लाख एंट्री लेव्हलची पदे रिक्त आहेत. यामध्ये उत्तर रेल्वे विभागात 19183 पदे रिकामी आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार महेश बाबू यांनी विचारलेल्या प्रश्नाला लोकसभेत लिखित स्वरुपात उत्तर दिले आहे. महेश बाबू यांनी रेल्वेत किती एंट्री लेव्हलची पदे रिकामी आहेत आणि कधीपर्यंत भरली जातील असा प्रश्न विचारला होता. यावर वैष्णव यांनी 149688 पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे. ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या महत्वाच्या माहितीनुसार, उत्तर रेल्वेनंतर दक्षिण मध्य विभागात सर्वाधिक 17,022 पदे रिक्त आहेत. पश्चिम विभागात 15,377 तर पश्चिम मध्य विभागात 11,101 पदे रिक्त आहेत. पूर्व विभागात 9,774 प्रारंभिक स्तराची पदे रिक्त आहेत. ऑपरेशनल आवश्यकतांनुसार नियुक्ती मागणी पत्रांसह पदे भरली जातात. सी आणि डी श्रेणीची पदे खुल्या निवडीद्वारे रेल्वे भरती मंडळ आणि रेल्वे विभागीय रेल्वेच्या भर्ती सेलद्वारे भरली जातात.