मुंबई राजमुद्रा दर्पण | केदारनाथमधील यात्रेतील भक्तांवर हवामानाचा मारा दिसून येत आहे. केदारनाथ मधे सलग सात तास झालेल्या बर्फवृष्टी आणि काही भागांमध्ये झालेल्या पावसामुळे यात्रा पुन्हा स्थगित करण्यात आली आहे. यादरम्यान, केदारधाम येथे असणाऱ्या भाविकांना मैदानी भागांमध्ये स्थलांतरितही करण्यात आले. प्रशासनाकडून यात्रेच्या विविध थांब्यांच्या ठिकाणी सध्या परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला जात आहे.
सोनप्रयागसहित केदारघाटी परिसरातही यावेळी रिमझिम पाऊस सुरुच होता. पुढेही यात्रेकरुंचा ओघ हजारोंच्या संख्येने सुरुच होता. यादरम्यान, पावसाचा जोर वाढल्यामुळं सोनप्रयाग येथे मात्र यात्रा थांबवण्यात आली. तिथे पावसाचा इशारा आणि हवामानाचे एकंदर तालरंग पाहता यमुनोत्री यात्राही थांबवण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी केदारनाथ यात्रा सुरुझाली, तेव्हा सोनप्रयागहून 6500 श्रद्धाळूंनी पायवाट मार्गानं मंदिर रोखाने प्रवास सुरु केला. तिथे उत्तरकाशीमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळं प्रशासनानं यमुनोत्री यात्राही थांबवण्याचा निर्णय हेतला. जानकीचट्टी येथे ही यात्रा थांबवण्यात आली. आता वातावरणात सकारात्मक बदल दिसल्यानंतर यात्रा पुन्हा सुरु होणार आहे.
त्या बरोबरच, केदारनाथ यात्रा आणि चारधाम यात्रेला भक्तांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वच देवस्थान बंद असल्यामुळे भक्तांना यावेळेला केदारनाथला भक्त मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहे त्यामुळे भक्तांची गर्दी होत आहे आणि आता भक्तांवर हवामानाचे संकट अवतरले आहे.