जळगांव राजमुद्रा दर्पण | १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना शहरातील रामेश्वर कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
शहरातील रामेश्वर कॉलनीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होती. २२ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेले. मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी नातेवाईक व मैत्रिणीकडे तपास केला तर कुठेही आढळून आली नाही.
मुलगी कुठे सापडत नाही म्हणून पीडित मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.