मुंबई राजमुद्रा दर्पण | महाविकास आघाडी मधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर 7 ठिकाणी ईडीने छापेमारी केली असल्याचे समोर आले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले असता त्यांनी तक्रार केली होती.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्यांपैकी एक मानले जातात. यांच्या संदर्भात सात ठिकाणी ईडीने छापेमारी करत कारवाई केळी आहे. अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे हे दापोली रिसॉर्ट आणि इतर ठिकाणी सुरू आहे.