मुंबई राजमुद्रा दर्पण | महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, निवडणूक आयोगाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. 2 जूनला विधान परिषद निवडणूक. सुरु होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 9जुन ही अंतिम मुदत आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या या दहा जागांसाठी 20 जून ला मतदान होणार आहे.राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एकीकडे राज्यसभा निवडणुकांचे बिगूल वाजले असतानाच आता राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत. 20 जून रोजी या निवडणुका घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीही राजकीय गणितांची जुळवाजुळव करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यसभेनंतर अवघ्या 10 दिवसांत राज्य विधान परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
शिवसेनेचे सुभाष देसाई, भाजपचे प्रवीण दरेकर, रामराजे निंबाळकर, सदाभाऊ खोत अशा दिग्गज नेत्यांची विधान परिषदेतील टर्म संपतेय. त्यांच्याच जागांवर निवडणुकीचे नियोजन केलेले आहे. विधान परिषदेच्या रिक्त होत असलेल्या 10 जागांपैकी 5 जागा भाजपाच्या आहेत. मात्र, सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाला फक्त चारच जागा निवडून येतील असे दिसत आहे.
याशिवाय शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी 2 जागा आणि काँग्रेसची 1 जागा निवडून येऊ शकतात. काँग्रेसला आणखी एका जागेसाठी म्हणजेच 10व्या जागेसाठी अधिक मतांची गरज आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजपा आणि काँग्रेसमध्ये मोठी शर्यत असणार आहे.