मुंबई राजमुद्रा दर्पण | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर आपला संताप व्यक्त करत त्यांनी महिलांचा अपमान केला, अशा शब्दात टीका केली..
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. त्यावरुन सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या भाषेवरुन भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.
हे आहेत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष ! ते सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलत आहेत. मला वाटतच होत की हे स्त्री द्वेषी आहेत. जिथे शक्य होईल तिथे महिलांचा अपमान करतात. मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे. ती गृहिणी आहे. ती आई आहे आणि यशस्वी राजकारणी आहे. देशातील इतर मेहनती आणि गुणवान महिलांप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी सर्वच महिलांचा अपमान केला आहे, असे सदानंद सुळे म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. तुम्ही कशाला राजकारणात राहता, घरी जा आणि स्वंयपाक करा, खासदार आहात ना तुम्ही ! कळत नाही का ? एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही का ?, एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झाली आहे. अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे वर झालेल्या टीकेचे त्यांचे पती सदानंद सुळे यांनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिले.
‘तुम्ही दिल्लीत जा, नाही तर म्हासानात जा ‘ पण शोध घ्या आणि आरक्षण द्या’ असे शाब्दिक बान पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर सोडली.