यावल राजमुद्रा दर्पण | दहिगाव येथील ४० वर्षीय प्रौढाला तब्बल 12 वेळा सर्पदंश झाला आहे. 25 रोजी गावातील मागासवर्गीय वस्तीत काम करत असताना त्याला पुन्हा सर्पदंश झाला. ही त्याची बुधवारची १३वी वेळ आहे.
दहिगाव येथील रहिवासी गणेश देविदास मिस्तरी (सुतार) (वय ४०) यांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास सापाने दंश केला. ही व्यक्ती गावातील मागासवर्गीय वस्तीत काम करत होती. लघुशंकेसाठी तेथील सार्वजनिक शौचालयात गेल्यावर त्यास सापाने दंश केला. सर्व प्रकार लक्षात येताच मिस्तरी यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला व सहकाऱ्यांनी उपचार केले. आता त्यांची प्रक्रूची चिंताजनक नाही. मिस्तरी यांना यापूर्वी एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ सात महिन्यांच्या काळात तब्बल १० वेळा सर्पदंश झाला होता. तेव्हा देखील हा चर्चेचा विषय ठरला होता.