मुंबई राजमुद्रा दर्पण | पालघर मध्ये बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना समोर आले आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली असून भुसावळ – बोईसर मार्गावर हा अपघात झाला. सदर अपघातामध्ये 10 ते 15 जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वाहन चालक नाशिकला बदलण्यात आला. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात येताच काही प्रवाशांनी ही बाब वाहकांच्या निदर्शनात आणून दिली. पण, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि वाघोबा घाटात हा अपघात झाला. बस चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. रातराणी एसटी बसमध्ये असणारा हा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगत प्रवाशांनी संपात व्यक्त केला.
दरम्यान जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. आता बस चालक आणि वाहक आवर कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.