जळगांव राजमुद्रा दर्पण | मा.पोलीस अधीक्षक डॉ.श्री प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी जळगाव, यांचे मार्गदर्शनाखाली १९ मे रोजी मा.पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी जिल्हापेठ पोस्टे येथील भाग ०५ गु.र.नं. ३३०/ २०२२ भादवी क. २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी नाव महेश शिवदास दिक्षे रा.लोणी ता. रिसोड जि. वाशीम हा भुसावळ रेल्वे पोस्टे जि.जळगाव येथील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात कोर्टात हजर करुन सदर आरोपीस में कस्टडी देण्यात आली होती. त्यास पोलीस पथकासह जिल्हा कारागृह येथे रवाना करण्यासाठी जात असतांना त्याने पोलीसांना चकमा देउन सदर आरोपी ने पळायचं केल्यावर वरप्रमाणे गुन्हा दाखल झाला. लगेचच मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखे कडील पोह लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, पोना रणजीत जाधव, पोकाँ विनोद पाटील, चा.पो.काँ. मुरलीधर बारी, चापोना. अशोक पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अशांचे पथक तयार करुन त्यांना आरोपींचा शोध घेणे बाबत योग्य त्या सुचना देउन रवाना करण्यात आले होते.
त्यावरुन वरील सर्व पोलीस स्टॉफ असे शासकिय वाहनाने सदर आरोपी नाव महेश शिवदास दिक्षे रा.लोणी ता. रिसोड जि. वाशीम याचा लोणी परिसरात शोध घेत असतांना मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहीती मिळाली कि सदर आरोपी अकोला रेल्वे स्टेशन वर आला आहे. त्याबाबत माहीती मिळाल्याने त्वरीत टिम रवाना करुन रेल्वे पोलीसांच्या मदतीने नमुद आरोपीस रेल्वे परीसरात ताब्यात घेउन यास ताब्यात घेउन अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करुन पुढील योग्य त्या कारवाई साठी जिल्हापेठ पोस्टे याचे ताब्यात दिले आहे.