जळगांव राजमुद्रा दर्पण | राज्यात पूर्वमोसमी पाऊसमुळे आणि आभाळ वातावरणामुळे नागरिकांची उन्हाच्या चटक्यांपासून सुटका झाली आहे. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. दरम्यान, जळगावात उन-सावल्यांचा खेळ सुरु असून गुरुवारी तापमान पुन्हा चाळिशीपार गेले हाेते. ४०.८ अंशांवर काळचे तापमान नोडवण्यात आले असताना ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली हाेती.
दरम्यान गेल्या काही दिवसापासून पारा ४० अंशापर्यंत राहणार पारा गुरुवारी ४०.८ अंशांवर गेला होता. तसेच काल दिवसभर अधूनमधून असे ढगाळ वातावरण हाेते. तरीदेखील उकाड्यात प्रचंड वाढ झाली हाेती. दरम्यान, आज शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पूर्वमाेसमी पावसाच्या सरी काेसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
जळगावात पारा काही दिवसापासून घसरला असून एप्रिल महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील पारा तब्बल ४५ अंशावर गेला होता. तर जिल्ह्यातील भुसावळ येथे राज्यातील सर्वाधिक ४७ अंशावर तापमानाची नोंद करण्यात आली होती. पूर्वमोसमी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.